आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया तलवारबाजी स्पर्धा:छत्रपती संभाजीनगरच्या संघाला विजेतेपद, खेळाडूंनी जिंकली 33 पदके; लातूरचा संघ ठरला उपविजेता

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) व भारतीय तलवारबाजी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित खेलो इंडिया दस का दम तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यापीठ परिसरातील साई केंद्रात झालेल्या स्पर्धेत यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यात 11 सुवर्ण, 12 रौप्य व 10 कांस्यपदकांचा समावेश आहे. लातूरचा संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरसह बीड, परभणी, धुळे, लातूर येथील एकूण 100 महिला खेळाडू विविध वयोगटात सहभागी झाल्या होत्या. स्पर्धा प्रमुख म्हणून तुषार आहेर यांनी जबाबदारी संभाळली. तसेच पंच म्हणून पिराजी कुसळे, आकाश बनसोडे, निकिता पाटील, आरती गायकवाड, संजय भूमकर, स्वप्निल तांगडे, अजय त्रिभुवन, विशाल दानवे यांनी काम पाहिले.

विजेते खेळाडू

14 वर्षाखालील मुली फॉईल गट - कनक भोजने (सुवर्ण), यशश्री वंजारे (रौप्य), मानसी हुलसुरकर (कांस्य), साक्षी पाटील (कांस्य). इप्पी - जानव्ही जाधव, स्नेहा कश्यप, मानसी वाघ, रोहिणी पाटील. सेबर - हर्षदा झोंड, श्रेया मोइम, स्वराली चव्हाण, भूमिका शिंदे

17 वर्ष फॉईल गट - अनुष्का अंकमुळे, माही घडवे, स्नेहा वाडकर, आरती सोनावणे. इप्पी - माही अरदवाड, वैभवी माने, आदिती चावले, गायत्री कदम. सेबर - दिव्यंका कदम, अक्षदा भवरे, प्रेरणा जाधव, सोनाली गायकवाड

19 वर्ष फॉईल गट - वैदेही लोहिया, अदिती अंभोरे, वैष्णवी धंगत, प्राप्ती सोनावणे. इप्पी - गायत्री कदम, स्नेहल पाटील, योगिनी देशमुख, उज्वला जाधव. सेबर - हर्षदा वंजारे, मैत्री तलवांदे, आरती सोनावणे, सैना रानमळ.

वरिष्ठ महिला गट फॉईल - हर्षदा दमकोंडवार (नागपूर), सानिया रानमळ (परभणी), उज्वला जाधव (छत्रपती संभाजीनगर), निशा पाटील (धुळे). इप्पी - स्नेहल पाटील (छत्रपती संभाजीनगर), किरण चापके (परभणी), अश्विनी कांबळे (बीड), वैष्णवी जाधव (परभणी). सेबर - हर्षदा वंजारे (छत्रपती संभाजीनगर), दिव्यश्री पाटील (धुळे), निधी चौधरी (धुळे), प्रतिमा कांबळे (बीड).

बातम्या आणखी आहेत...