आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजबलपूर येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले आहे. ईशा टाकसाळे हिला रौप्यपदक तर स्वराज भोंडवेला कांस्यपदक प्राप्त झाले. तर टेबल टेनिसमध्ये तनिषा कोटेचाने फायनलमध्ये धडक मारली.
इशाचा नेम रौप्यपदकावर
मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा टाकसाळेने रौप्यपदक आपल्या नावे केले. ती पनवेल येथे ज्येष्ठ प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती यंदा दहावीची परीक्षा देत असूनही शाळा, अभ्यास आणि नेमबाजीचा सराव या तीनही गोष्टी व्यवस्थित सांभाळून वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते. ती दररोज साडेतीन तास नेमबाजीचा सराव करीत आहे.
स्वराज भोंडवेला कास्य
मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराज भोंडवेला कांस्यपदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला असून पदार्पणातच त्याने पदकाचे स्वप्न साकार केले आहे.
रॅपिड फायरमध्ये स्वराजला कास्य
मुलांच्या 25 मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराज भोंडवेला कांस्यपदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला असून पदार्पणातच त्याने पदकाचे स्वप्न साकार केले आहे.
टेबल टेनिस मध्ये तनिषा अंतिम फेरीत
महाराष्ट्राचे पदकांचे आव्हान कायम राखताना तनिषा कोटेचाने मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेबल टेनिसमध्ये आणखी एक पदक निश्चित केले. तनिषाने उपांत्य फेरीतील रंगतदार लढतीत हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती हिचा ४-३ अशा गेम्स मध्ये पराभव केला. शेवटपर्यंत चुरशीने झालेला हा सामना तिने १२-१०,६-११,५-११,१२-१०, ११-१३, ११-८,११-९ असा जिंकला. अंतिम फेरीत तनिषाचा सामना दिल्लीच्या लक्षिता नारंगशी होईल. मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदीला उत्तर प्रदेशच्या दिव्यांश श्रीवास्तवने १२-१०,११-२,११-५, ११-२ असे पराभूत केले. मात्र मोदीला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी आहे.
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच
महाराष्ट्राच्या सारा राऊळ व रिया केळकर तसेच मुलांमध्ये आर्यन दवंडे व मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे वाटचाल केली. मुलांच्या गटात आर्यनने प्राथमिक फेरीत पहिले स्थान घेताना ६९.७० गुणांची कमाई केली. प्राथमिक फेरीअखेर मानस हा चौथ्या स्थानावर असून त्याचे ६६.६० गुण झाले आहेत. मुलींमध्ये साराने ४०.४० गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रियाने ४०.२० गुण घेतले आहेत.
बास्केटबॉलमध्ये जाता जाता महाराष्ट्राचा विजय
सलग दोन पराभवामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या महाराष्ट्राच्या मुलींनी जाता जाता अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थानवर ८९-५८ असा विजय मिळविला. महाराष्ट्राच्या विजयात पुन्हा एकदा अनन्या भावसारने सर्वाधिक गुणांची नोंद केली. तिने आज ३३ गुण नोंदवले. तिला गुंजन मंत्रीने १७ आणि भूमिका सर्जेने १६ गुणानसह साथ केली.
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राला 2 पदके निश्चित
महाराष्ट्राच्या अन्वर शेख व उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत बाँक्सिंगमध्ये दोन पदके निश्चित केली. मुलांच्या ४८ किलो गटात अन्वरने मध्य प्रदेशच्या लोकेश पालचा ५-० असा पराभव केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक ठोसे व उत्कृष्ट बचाव अशा दोन्ही तंत्रांचा कल्पकतेने उपयोग केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही. उस्मानने ५१ किलोत हरियाणाच्या गंगा कुमार याचा चुरशीच्या लढतीनंतर ४-१ असा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.