आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण सोमवारनिमित्त जादा बसेस:खुलताबाद, वेरूळला शनिवारी 30, सोमवारी 16 एसटी बस सोडणार

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यात खुलताबाद येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून शनिवारी ३०, तर सोमवारी १६ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच मागणीनुसार जास्तीच्या गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

श्रावण महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यासह विविध शहरांतून खुलताबाद येथील भद्रा मारुती तसेच वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे एसटी महामंडळाने शनिवार व सोमवारी औरंगाबाद विभागातून विषेश जादा गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर शनिवारी ३० तर सोमवारी १६ जादा बसेस सोडण्यात येतील. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून ११, सिडकोतून ११, पैठण बसस्थानकातून १, सिल्लोड १, वैजापूर १, कन्नड २ अशा बसेस सोडण्यात येतील. त्यामुळे भाविकांना दिवसभर बसची सुविधा मिळणार आहे. तसेच दर सोमवारी औरंगाबाद विभागातून १६ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सिडको बसस्थानकातून ४, मध्यवर्ती बसस्थानकातून ४, सिल्लोड आगारातून ४, कन्नड ४ अशा बसेस धावतील.

कन्नड, धुळे, चाळीसगावला जाणाऱ्या बसेस थांबतात खुलताबादला एरवी दररोज औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून कन्नड, धुळे, चाळीसगाव या मार्गांवर जाणाऱ्या सर्व बसेस खुलताबाद येथे थांबतात. त्यामुळे भाविकांना जाण्यास अडचण येत नाही. परंतु, श्रावण महिन्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नियमित बसेस व्यतिरिक्तही जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी व सोमवारी खुलताबादला जाणाऱ्या भाविकांची साेय हाेईल, अशी माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...