आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन बातमी:अल्पवयीन मुलीस पळवले; खंडपीठात हेबियस कॉर्पस दाखल

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस दाखल केला आहे. हे प्रकरण २२ जून रोजी सुनावणीस आल्यानंतर खंडपीठाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती बी.पी. देशपांडे यांनी पुढील सुनावणी २४ जून रोजी ठेवली आहे. पळवून नेलेल्या मुलीचे वय चार दिवसांनी १८ वर्षे पूर्ण होत आहे. मुलीस आपल्या ताब्यात द्यावे, अशी विनंती तिच्या वडिलांनी खंडपीठात केली.

या संदर्भात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद अंबाजोगाई पोलिस स्टेशनमध्ये तिच्या वडिलांनी दाखल केली. गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी बेपत्ता असून तिच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे.या प्रकरणात मुलीशी संपर्क होत नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या वतीने अॅड. शिरीष कांबळे यांनी हेबियस कॉर्पस दाखल केले आहे. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील किशोर होके पाटील बाजू मांडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...