आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीला पळवून नेत तिचा विनयभंग करणाऱ्या रोहित निकाळजे (१९, रा. शिवशंकर कॉलनी) या आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. १० डिसेंबर २०१९ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. पीडिता व आरोपीची बहीण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. आरोपी पीडितेला नाशिक, मुंबई, पुणे असा घेऊन गेला. मुंबईतील रेल्वे प्रवासात आरोपीने बळजबरी पीडितेचे चुंबन घेतले. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ अन्वये १ वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.