आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमाचे नाटक करत लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणाने १५ वर्षीय मुलीला पळवून नेले. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याने गारखेड्यात काही काळ तणाव निर्माण झाला. परंतु जवाहरनगर पोलिसांनी मात्र संवेदनशीलपणे प्रकरण हाताळत सलग १५ तास तपास करत वैजापूर परिसरातून तरुणाला पकडले. त्यानंतर ठाण्यात आणत तरुणीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. तर आतिफ आरिफ शेख (२२) याच्यासह त्याला मदत करणारा मित्र नदीमला अटक केली. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. दहावीत शिकणारी एक मुलगी कुटुंबासह गारखेडा परिसरात राहते. तिच्या वडिलांचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी तिची सोशल मीडियावर आतिफशी ओळख झाली. यातून व्हॉट्सअॅप क्रमांकाची देवाणघेवाण झाली व मैत्री वाढत गेली. दोन वर्षांत आतिफने प्रेमाचे नाटक सुरू केले. नंतर लग्नाचा तगादा लावला. आतिफही गारखेड्यातच राहत असल्याने तरुणीच्या कुटुंबाला कुणकुण लागली होती. त्यांनी दोघांची समजूत काढली. मात्र, सोमवारी तरुणी घरी एकटी असताना आतिफने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
तक्रार प्राप्त होताच अलर्ट जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे तक्रार देताना मुलीच्या वडिलांनी आतिफवर संशय व्यक्त केला. आंतरधर्मीय प्रकरण असल्याने पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवली. उपनिरीक्षक संतोष राऊत, वसंत शेळके, अंमलदार मारुती गोरे यांचे पथक रवाना झाले. आतिफच्या काही मित्रांना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत पोलिस रात्री पर्यंत वाळूज, नगर नाकापर्यंत पोहोचले.
दुचाकीने दोघेही वैजापूरच्या दिशेने गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर तांत्रिक तपासावर भर देत वैजापूरमध्ये तपास सुरू झाला. सूत्रांच्या माहितीतून, आतिफ दुचाकी वैजापूरला सोडून मित्राच्या मदतीने कार घेऊन पसार झाल्याचे कळाले. पथक तिकडे रवाना झाले. वरीष्ठ पोलिस अधिकारी रात्रभर ठाण्यात बसून होते. इतर पथकांच्या संपर्कात राहून राऊत याच्या पथकाने मंगळवारी दोघांना रस्त्यात पकडले. मुलीला बालकल्याण समितीच्या उपस्थितीत जवाब नोंदवून कुटुंबाच्या स्वाधीन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.