आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यवार्ता:प्रत्यारोपणासाठी दुबिर्णीद्वारे योनीभागातून किडनी काढण्याची शस्त्रक्रिया! महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये यशस्वी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्हातील 35 वर्षीय तरुणास किडनी फेल्युअर आजाराने एक वर्षापासून ग्रासले होते. यामुळे या तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. तो नियमित डायलीसीस करू लागला. त्यानुसार या रुग्णास त्याच्या आईने किडनी देण्याचे ठरवले.

किडनी प्रत्यारोपणामध्ये किडनी दात्याची एक किडनी काढून रुग्णास लावण्यात येते. या किडनी दात्या आईची शस्त्रक्रिया ही संपुर्णपणे दुर्बिणीद्वारे झाली व किडनी योनी मार्गातुन शरीराच्या बाहेर काढण्यात आली.

48 तासात रुग्ण घरी

यामुळे किडनी दात्याच्या शरीरावर कोणतीही मोठी जखम मोठे टाके टाळता आले. तसेच किडनी दात्याने 24 तासात आहार घेणे चालु केले. व रुग्णालयातून 48 तासात किडनी दात्यास सुटटी करून घरी पाठवणे शक्य झाले. नियमित आहार लवकरात लवकर सुरु करता आला. तसेच रुग्णालयातुन 48 तासात घरी जाता आले.

या 35 वर्षाच्या रुग्णावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. किडनी दात्यासाठी अशा प्रकारच्या दुर्बिणीच्या शस्त्रकिया करून कमीत कमी जखम टाके दिल्यास किडनी दात्यांचे प्रोत्साहन वाढेल व आपल्या समाजातील किडनी दात्यांची संख्या देखील वाढेल. यामुळे सध्या जगात किडनी विकार होऊन किडनी दाता न भेटल्यामुळे जे रुग्ण मृत्यु पावतात. त्यांच्या संख्येमध्ये सुध्दा घट होणे अपेक्षित आहे.

पहिल्यांदाच पर पडली अशी शस्त्रक्रिया

किडनी फेल्युअर साठी सर्वोत्तम उपचार म्हणजे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया .किडनी प्रत्यारोपणाचे फायदे म्हणजे रुग्णाची सुधारित जिवनशैली, आहार वाढणे, वजन नियमीत होणे, डायलिसीस बंद होणे व डायलिसीस मुळे होणा-या त्रासापासून सुटका होणे, सतत रुग्णालयात जाण्याची गरज नसणे. त्यानुसार या रुग्णास त्याच्या आईने किडनी देण्याचे ठरवले.

ही शस्त्रकिया किडनी विकार शल्यचिकीत्सक डॉ. आदित्य येळीकर यांनी त्यांच्या विशेष प्राविण्यातून यशस्वी पार पाडली. त्यांच्या टिममध्ये डॉ. शरद सोमाणी व किडनी विकार तज्ज्ञ डॉ समीर महाजन, भुलतज्ज्ञ डॉ. बालाजी असेगावकर यांचा समावेश होता.

अशी शस्त्रकिया महाराष्ट्रात प्रथमच करण्यात आली. किडनी दात्यासाठी अशा प्रकारच्या दुर्बिणीच्या शस्त्रकिया करून कमीत कमी जखम टाके दिल्यास किडनी दात्यांचे प्रोत्साहन वाढेल.

सदर शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीचे विश्वस्त व अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, कमलनयन बजाज रुग्णालय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा वर्मा आणि वैद्यकिय संचालक डॉ. मिलिंद वैष्णव यांनी डॉ. अदित्य येळीकर व टिमचे अभिनंदन केले.