आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे लसीकरण:सोमवारपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; औरंगाबादेत चार ठिकाणी होणार मुलांचे लसीकरण

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १ जानेवारीपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. जिल्ह्यात २ लाख १३ हजार ८२३ तर शहरात ६९ हजार ९९८ मुले आहेत. ६० वर्षांवरील व्याधी असलेल्या वयोवृद्धांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

मेल्ट्रान, क्रांती चौक, मनपा आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटलमध्ये मुलांना लस दिली जाईल. ग्रामीण भागात दहा केंद्रांवर लसीकरण हाेणार आहे. केंद्रांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लहान मुले तसेच ६० वर्षांवरील बाधित व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे. मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाईल. जिल्ह्यात ६० वर्षांवरील बाधित व्यक्तींची संख्या १ लाख ०२ हजार ६१३ आहे.

दुसरा डोस झाल्यानंतर ९ महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पोर्टलवर किती रजिस्ट्रेशन झाले याची माहिती मिळत नसल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...