आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:किलेअर्क क्वॅारंटाइन सेंटर बनले शूटिंगचा स्पॉट, 'संदेसे आते हैं...’ गीतातून भावनांना मोकळी करून दिली वाट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक
  • ‘क्वॅारंटाइन डे’ या मथळ्याखाली पॉझिटिव्ह रुग्णांनी व्हिडिओ बनवला.
Advertisement
Advertisement

रोशनी शिंपी  

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद होते. पण तरीही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार व शिल्पा शेट्टीसारख्या दिग्गज कलावंतांनी एकाहून एक सरस सकारात्मक, कॉमेडी व्हिडिओ बनवले. पण शहरात तर किलेअर्क क्वाॅरंटाइन सेंटरच चित्रीकरणाचा स्पॉट बनल्याचे एका व्हिडिओतून समोर आले. कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या पण सौम्य लक्षणे असणाऱ्या सहा ते सात जणांनी मिळून “संदेसे आते हैं, हमे तडपाते हैं, चिठ्ठी आती है, वो पूछे जाती है....’ या गीतावर तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवून टाकला. याच्या माध्यमातून कुटुंबीयांच्या भेटीसाठी सर्वजण कसे आतुर आहेत, हे दाखवण्यात आले आहे.

शनिवारी हा व्हिडिओ शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. “बॉर्डर’ या चित्रपटात कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या जवानांची व्यथा या गीताद्वारे मांडण्यात आली होती. अशीच काहीशी अवस्था क्वाॅरंटाइन सेंटरमधील या लोकांची झाल्याचे यातून दिसत आहे. कोरोनाची विशेष लक्षणे नसलेल्यांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये १० ते १४ दिवस क्वाॅरंटाइन अर्थात अलगीकरणात ठेवले जात आहे. येथे कुटुंबापासून दूर राहण्याशिवाय पर्यायच नाही. अशा वेळी सहा ते सात जणांनी मिळून आपल्या भावनांना वाट करून दिली. विशेष म्हणजे व्हिडिओत दिसणारे सर्व जण निष्णात कलावंत नाहीत, पण गीताच्या बोलावर उत्तम अभिनय केल्याचे दिसते. त्यांचा हा उपक्रम सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया सामान्यांतून येत आहे.

संकटाच्या काळात आपले विचार प्रेरणादायी आणि कल्पक असतील तर हा काळ निराशेचे ढग न ठरता, ऊर्जादायी आणि सृजनशीलतेचा काळ ठरेल, असा संदेशच या व्हिडिओच्या माध्यमातून या मंडळींनी दिला आहे.

कल्पक उपक्रमातून शोधली चैतन्य देणारी वाट

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आली की सर्वजण प्रचंड तणावात येतात. अनेकदा तर या सेंटरवरील असुविधांवर भाष्य करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. अशा वेळी समोर येणाऱ्या समस्यांवर त्रागा करण्यापेक्षा कल्पक उपक्रमातून शोधलेली ही वाट अनेकांना चैतन्य देणारी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Advertisement
0