आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनप्रकरणी जामीन फेटाळला:जिल्हा व सत्र न्‍यायाधीशांचा निकाल; पैशाच्या वादातून हत्याराने वार करून काढला काटा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारदार हत्‍याराने तरुणाचा खून केल्याप्रकरणात आरोपी कन्‍हैय्या ऊर्फ कन्‍हा चंद्रया गोणेला (32, रा. दलालवाडी पैठण गेट) आणि सय्यद पाशा सय्यद हानिफ (24, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर) या दोघांनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एस. मौदेकर यांनी फेटाळला. प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी काम पाहिले.

नेमके प्रकरण काय?

प्रकरणात मृत रिजवान यांचे वडील इम्रानुलहक ऐनुलहक (62, रा. चंपा चौक, म्हाडा कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, घटनेच्‍या 15-20 दिवसांपूर्वी फिर्यादीचा मुलगा समलान याला आरोपी मोहसीन ऊर्फ हमला व त्‍याचे दोन साथीदार पाशा सय्यद आणि कन्‍हैय्या गोनेला यांनी धमकी दिली होती की, तुझा भाऊ रिजवान कोठे आहे, त्‍याला येथे बोलाव नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकू. घटनेच्‍या आठ दिवसांपूर्वी मोहसीन ऊर्फ हमला याच्‍याकडून माझे पैसे घ्‍यायचे आहे. त्‍याचे दोन ते तीन साथीदार हे पानटपरीवर येतात आणि सामान घेवून जातात, पैसे मागितल्यास जीवे मारण्‍याची धमकी देतात असे रिजवानने फिर्यादीला सांगतिले होते. घटनेच्‍या दोन दिवसांपूर्वी दुपारी रिजवान याने फिर्यादीला फोन करुन मोहसीन ऊर्फ हमला याने तडजोड करण्‍यासाठी बोलावल्याचे सांगितले, मात्र फिर्यादीने जाण्‍यास नकार दिला.

20 जून रोजी सकाळी 6.00 वाजता रिजवान हा घरातून गेला, रात्री साडे अकरा वाजता फिर्यादीला जवाई इम्रान खान यांनी फोन करुन दलालवाडी येथे रिजवान याचे भांडण होऊन जखमी झाला असून त्‍याला घाटीत नेल्याचे सांगितले. घाटीत रिजवानला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. फिर्यादीहे घाटीत गेले असता, रिजवानच्‍या शिरावर धारदार हत्‍याचारे वार होते. तर त्‍याचा मित्र वसीम कुरेशी यावर देखील आरोपींनी धारदार हत्‍याराने वारकरुन गंभीर जखमी केले होते. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिसांनी वरील तिघा आरोपींना 21 जून रोजी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...