आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धा:किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल 24, 25 फेब्रुवारीला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल तीन वर्षांनंतर पुन्हा होत आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील भानुदास चव्हाण सभागृहात २४ व २५ फेब्रुवारीला होणाऱ्या या महोत्सवाची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याचे आयोजकांनी कळवले आहे.“सकस आहार, बहरलेला निसर्ग व सुदृढ समाज’ असे यंदाच्या महोत्सवाचे घोषवाक्य आहे. महोत्सवाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी या विषयावर आधारित चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येतील.

सकस अन्नाची ओळख व्हावी म्हणून विशेष प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. या दोन दिवसांत विविध सत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावाजलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक सुहास वैद्य (९८२३०३०४५६) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन रोटरी इलाइटचे अभय मार्थ, डॉ. उत्तम काळवणे, हरीश जाखेटे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...