आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरणोत्सव:जगप्रसिद्ध वेरुळच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव, आगामी पाच ते सहा दिवस पर्यटकांसह भाविकांना घेता येईल अनुभव

​​​​​​​वेरूळ ( वैभव किरगत )एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात.

ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव सोहळा बुधवारी पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात.

हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती बुधवारी आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल. महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपड़ी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. तर गुजरात मधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात ही आहे.

गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली ( पिंपळ ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविन्याची प्रथा होती. तर गेली सहा वर्षापासून दरवर्षी हा सूर्यकिरणोत्सव सोहळा दिव्यमराठी सर्वप्रथम आपल्या वाचकासाठी प्रकाशित करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...