आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:उस्मानपुरा गुरुद्वारात उद्या कीर्तन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिखांचे सातवे गुरू हर राय यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, ३ फेब्रुवारीला उस्मानपुरा येथील गुरुद्वारात अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शिखांचे सातवे गुरू हर राय यांची जयंती साजरी करण्यात येते. बुधवारी अखंड पाठाला सुरुवात करण्यात आली. ३ फेब्रुवारीला पाठाची समाप्ती होणार आहे. या वेळी सकाळी १० वाजता भाई अमरजितसिंह, भाई परनामसिंह आणि गुरुमीतसिंह यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...