आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादासाहेब गणोरकर मेमोरियल चषक स्पर्धा:युनिव्हर्सल, युवा क्लब, सलीम स्कूलला किताब

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युनिव्हर्सल हायस्कूल, बिडकीनच्या युवा क्लब, शिवना आणि सलीम उर्दू स्कूल संघाने सर्वाेत्तम खेळीतून दादासाहेब गणोरकर मेमोरियल चषक व्हॉलीबॉल स्पर्धाचा किताब पटकावला. हे चारही संघ आपापल्या गटात पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल, गंगापूर संघ आणि एसव्हीएस क्लब संघ उपविजेते ठरले. व्हीएलसी हॉलीबॉल अकॅडमी व भाजप क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. कार्यक्रमास नंदकुमार उकडगावकर, समीर लोखंडे, डॉ. दयानंद कांबळे, एम. ई. पाटील, दहिवाल उपस्थित होते. या स्पर्धेचे आयाेजन अभिषेक गणोरकर, लोकेश ठाकरे व सचिन अत्री यांनी केले होते. लोकेश ठाकरे, अभिषेक गणोरकर, ऋषिकेश गणोरकर, सायली गणोरकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. शुभम पंडित वेदांत हावळे प्रमोद जेठे यश मगरे अंकिता तुपे आदिती बागुल मधुरा ठाकूर प्रेम जाधव आर्यन उबाळे, घोडके आदींनी पंच म्हणून काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...