आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघांवर चाकू हल्ला:औरंगाबादच्या अंगुरीबाग परिसरात माथेफिरुचा 4 जणांवर चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी अटकेत, क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

शहरात एका माथेफिरुने 4 जणांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली आहे. या चाकू हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच इतर 3 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादच्या अंगुरीबाग / मोतीकारंजा परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव सय्यद दानिश असून तो 24 वर्षांचा होता. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार या तीन जणांचा समावेश आहे.

हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून नितीन उर्फ गब्या खंडागळे असे त्याचे नाव आहे. यासंदर्भात क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 302, 307, 326, 324, 323, 34 सह गुन्हा दाखल केला असून यात नितीन उर्फ गब्ब्या भास्कर राव खंडागळेसह त्याची आई, बहिण आणि भावाला सह-आरोपी केले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव सय्यद दानिश असून तो 24 वर्षांचा होता
मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव सय्यद दानिश असून तो 24 वर्षांचा होता

पोलिसांनी सय्यद रफियोद्दीन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, फिर्यादीच्या भावाचा मुलगा दानिश याच्यावर हल्ला करून गब्याने त्याला जीवे मारले. तर सलीम, बाब आणि जब्बार उर्फ शम्मू यांच्या सुद्धा चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर गब्याचा भाऊ, बहीण आणि आईने सुद्धा जखमींना धक्काबुक्की आणि मारहाण केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक जी.एच. दराडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...