आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहिंसेच्या अभावी आत्मसाक्षात्कार होणे शक्य नाही. जगातील प्रत्येकाला शांतता हवी आहे, आनंद हवा आहे, पण तो दुःखाने भयभीतही आहे. भगवान महावीरांनी अहिंसेचे तत्त्व परम सुखाचा शोध घेणाऱ्यांसाठी दिले आहे. पण, आपण प्रवचन ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की, केव्हा प्रवचन संपतं आणि आपण घरी जातो. ही चिंता आणि अस्वस्थताच तुम्हाला अहिंसेपासून दूर ठेवते. दुसऱ्यांना वेदना देणे म्हणजे हिंसा, ही अपूर्ण व्याख्या आहे. अशा हिंसेच्या त्यागातून निर्माण होणारी अहिंसाही अपूर्ण आहे. वास्तविकतः जोपर्यंत आत्म्यापासून आसक्ती आणि द्वेष संपत नाही, तोपर्यंत अहिंसा येत नाही. अहिंसेची व्याख्या करताना भगवान महावीर म्हणाले, जगा आणि जगू द्या. यामध्ये आधी जगा आणि नंतर जगू द्या असे म्हटले. कारण जो नीट जगतो तो इतरांनाही जगू देतो. ज्याला स्वतःला जगू द्यायचे नाही, जो स्वतःचे रक्षण करत नाही तो सर्वात धोकादायक ठरतो.
आसक्ती आणि द्वेषमुक्त होऊन जगायचे आहे. ही अहिंसेची सर्वोत्तम उपलब्धी आहे. शांततेच्या अनुभवासह असलेल्या जीवनाचे महत्त्व न समजणे म्हणजे हिंसेचे पोषण होय. अस्वस्थ राहणे, रात्रंदिवस बेचैन राहणे हीसुद्धा हिंसाच आहे. अशा वेळी तुमच्या मनाची, वचनाची आणि कर्माची स्थिती काहीही असली तरी त्याचा परिणाम इतरांवरही होतो. द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा अशा दोन प्रकारच्या हिंसा आहेत. शारीरिक गुणांची हत्या ही द्रव्य हिंसा आहे. आणि आध्यात्मिक गुणांवर प्रहार करणे, त्यात बाधा आणणे ही हिंसा आहे. द्रव्य हिंसेत इतरांप्रती हिंसा होऊही शकते किंवा नाहीही, पण भाव हिंसेत तुमच्या आत्म्याचा नाश नक्कीच होतो. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. जो स्वतःला वेदना देणाऱ्याने असा विचार करू नये की, यामुळे फक्त त्याचेच नुकसान होईल. यामुळे संपूर्ण जगाचे नुकसान होईल. म्हणूनच भगवान महावीरांचा संदेश आहे की, हिंसेच्या भावाने इतरांचे विघटन नंतर होईल, आधी स्वतःच्या प्राणांचे विघटन होईल. आपल्या प्राणाचे विघटन होणे म्हणजे हिंसा होय. आपल्या भावनांचा इतरांवरही परिणाम होतो.
हिंसा ही आपल्या आसक्ती आणि द्वेषामुळे होते. म्हणूनच भगवान महावीर म्हणतात, स्वतः वाचवलात तर दुसरा आपोआपच वाचेल. इतरांना वाचवायला गेलात तर तो वाचेलच असे नाही, पण तुम्ही स्वतःला आसक्ती व द्वेषापासून वाचवले तर हिंसा शक्य नाही. आपली दृष्टीही भावनांकडे असायला हवी. “मी देह आहे किंवा देहच मी आहे” असे मानल्यानेच हिंसेची सुरुवात होते. हे अज्ञान आणि शरीराची आसक्ती हेच हिंसेचे कारण आहे. आपण स्वतः जगायला शिकावे. आणि सर्व बाह्य प्रवृत्ती नाहीशा होतात तेव्हा जगणे शक्य होते. जो स्वतः जगतो तो इतरांनाही जगायला मदत करतो. तुमचे जीवन हिंसेपासून दूर आणि अहिंसामय राहण्यासाठी तुम्ही हिंसा टाळली पाहिजे.
आचार्य विद्यासागरजी महाराज
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.