आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ज्ञानाला नीतीचे अधिष्ठान आवश्यक ; डॉ. बगाडे

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“समाजाच्या आधुनिकतेसाठी विवेकनिष्ठ ज्ञानाची आवश्यकता असते. या ज्ञानाला नीती आणि सिद्धांताचे अधिष्ठान असले पाहिजे. विवेक हेच ज्ञानाचे प्रामाण्य असते,’ असे प्रतिपादन विचारवंत आणि संशोधक डॉ. उमेश बगाडे यांनी केले.

ते प्रा. प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठानतर्फे निर्मिक साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक व समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे होते.शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच निर्मिक साहित्य पुरस्कार वितरण सोहळा झाला. यात वैचारिक लेखनासाठी-२०२१ चा पुरस्कार डॉ. दिलीप चव्हाण, साहित्य संशोधनासाठी-२०२२ चा पुरस्कार डॉ. सुधाकर शेलार यांना प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिगंबर खोजे, कृष्णा पांचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन शीतल लुलेकर-पांचाळ यांनी केले तर आभार डॉ. अक्षय घोरपडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...