आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कबड्डी स्पर्धा:कोल्हापूरच्या छावा संघाचा बाद फेरीत प्रवेश; पुणे, ठाणे, नगर संघांची विजयी सुरुवात

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायूकुमार मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरच्या छावा संघाने बाद फेरीत प्रवेश केला. पुणे येथील शरदचंद्र पवार बंदिस्त क्रीडा संकुल, जुन्नर येथे मॅटवर सुरू झालेल्या स्पर्धेत सलामी सामन्यात पुणे, ठाणे, मुंबई शहर, नगर संघांनी विजयी सुरुवात केली. स्पर्धेत एकूण 30 संघांनी सहभाग घेतला आहे.

स्पर्धेत मुंबई शहरच्या गोलफादेवीने अ गटात बीडच्या शारदा प्रतिष्ठानला 34-34 असे बरोबरीत रोखले. मध्यांतराला 14-17 अशा 3 गुणांच्या पिछाडीवर पडलेल्या गोलफादेवीने तुषार, विष्णू लाड, विष्णू हरमळकर यांच्या उत्तरार्धातील चमकदार खेळाच्या जोरावर ही किमया साधली. शारदा प्रतिष्ठानच्या संदेश देशमुख, ओंकार शिंदे, अंकुश शिंदे यांचा खेळ उत्तरार्धात बहरला नाही. मुंबई शहरच्या अंकुरने ब गटात सांगलीच्या जय मातृभूमीचा 52-28 असा धुव्वा उडविला. सुशांत साईलच्या झंजावाती चढायांना सांगलीकरांकडे उत्तर नव्हते.

पालघरची आझादवर मात

इ गटात पालघरच्या इच्छाशक्तीने अहमदनगरच्या आझाद मंडळाचा 27-18 असा सहज पाडाव केला. पहिल्या डावात 15-07 अशी आघाडी घेणाऱ्या इच्छाशक्तीने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत हा विजय साकारला. यश ठोंबरे, साहिल कदम, प्रेम मंडल इच्छा शक्तीकडून, तर आकाश रणनवरे, प्रथमेश जाधव आझाद मंडळाकडून उत्कृष्ट खेळले. अ गटात नांदेडच्या बाबुराव चांदेरे फौंडेशनने चुरशीच्या लढतीत बीडच्या शारदा प्रतिष्ठानचा 25-23 असा पराभव करीत विजयी सुरुवात केली. मध्यांतराला 08-12 अशा 4 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या चांदेरे फौंडेशनला आयुब पठाण, किरण मगर यांच्या चतुरस्त्र खेळाने हा विजय मिळवून दिला. शारदा प्रतिष्ठानच्या संदेश देशमुख, आकाश राठोड यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.

ज्ञानेश्वर, शुभम, विशाल चमकले

ड गटात कोल्हापूरच्या छावा मंडळाने दोन विजय मिळवीत आरामात बाद फेरी गाठली. प्रथम त्यांनी मुंबई शहरच्या स्वस्तिकचा 49-29, तर दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या उजाळा मंडळाचा 30-23 असा पराभव केला. ज्ञानेश्वर जाधव, शुभम व ऋषिकेश गावडे, अक्षय बागल, अमन बिसुरे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ब गटात पुण्याच्या राकेशभाऊ घुले संघाने प्रथम रायगडच्या मिडलाईन स्पोर्ट्सचा 45-27 असा, तर नंतर कोल्हापूरच्या शाहू स्पोर्ट्सचा 31-26 असा पाडाव करीत साखळीत दोन्ही विजय मिळविले. या दोन्ही विजयाने त्यांनी या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. विशाल ताटे, पवन कुऱ्हाडे, गौरव तापकिरे, हर्षद भेखे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

बातम्या आणखी आहेत...