आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भारंब्याच्या तलाठी लाच घेताना, कोतवाल जाळ्यात

कन्नड/ पिशाेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारंबा (ता. कन्नड) येथे कार्यरत तलाठी दीपाली योगेश बागूल (३२) आणि पिशोर येथील कोतवाल पदावर कार्यरत शेख हारुण शेख छोटू (४१) या दोघांना ३० हजार रुपयांची लाच घेतना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार भारंबा तांडा येथील तलाठी सजा कार्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजता घडला. ५४ वर्षीय तक्रारदाराची भारंबा शिवारातील वडिलोपार्जित जमीन आहे. तक्रारदार व इतर दोघा भावांच्या नावे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी बागूल व काेतवाल यांनी ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली हाेती. याप्रकरणी एस. एस. शेख यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...