आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:कुणाल चव्हाणची ‘युपीएससी’त बाजी;ऑल इंडिया रँकमध्ये 211 वे स्थान पटकावले

परभणी3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2019चा निकाल आज जाहीर केला आहे. या परीक्षेत परभणीतील कुणाल मोतीराम चव्हाण यांनी युपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये 211 वे स्थान पटकावून बाजी मारली आहे. परभणी शहरातील स्नेहशारदा नगरातील रहिवासी कुणाल चव्हाण याचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गांधी विद्यालयात झाले. दहावीत मेरीटमध्ये आल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. बारावीतही तो मेरीटमध्ये आला. त्यानंतर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवीला असल्यापासूनच त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली होती. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीत युपीएससीच्या तयारीसाठी गेला होता. आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात त्याने देशात 211 वा क्रमांक पटकावला आहे. त्याचे वडील भुमी अभिलेख कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तर आई गृहिणी आहे.