आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना चाचणी:लॅब कोरोना तपासणी 600 रुपयांनी स्वस्त, राज्याच्या आरोग्य विभागाचा आदेश

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना चाचणीच्या शुल्कामध्ये ६०० रुपयांची कपात झाली आहे. स्वतः प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास पूर्वी २५०० रुपयांचे शुल्क आकारले जात होते ते यापुढे १९०० रुपये एवढेच शुल्क आकारले जाईल. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला अाहे.

काेराेना चाचणीसाठी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांमध्ये तब्बल साडेचार हजार रुपये आकारले जात होते. यातून रुग्णांची लूट हाेत असल्याचा प्रकार सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणला हाेता. त्याची आराेग्य मंत्री डाॅ. राजेश टाेपे यांनी गंभीर दखल घेऊन हे दर २५०० ते २८०० रुपयांपर्यंत खाली आणले हाेते. आता पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचणी दरात कपात करण्याचा निर्णय सरकारने ७ अाॅगस्ट राेजी घेतला अाहे. शासन निर्णयानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने शिफारस केलेल्या आणि विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या अँटिजन व अँटिबॉडी चाचण्यांच्या वापराबाबत तसेच खासगी प्रयोगशाळांना दर निश्चित करून देण्यासाठी पुन्हा शासन स्तरावर समिती गठित करण्यात आली. या समितीकडून नवा मसुदा तयार करण्यात आला.

किट्सची उपलब्धता वाढल्याने दर घटले
लॉकडाऊनमध्ये शिथिलता अाल्यामुळे अाता कोरोना तपासणीसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम किट‌्स, पीपीई किट्सची उपलब्धता वाढली अाहे. परिणामी त्यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. त्यामुळे या समितीने पुन्हा खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करून आरटीपीसीआर, अँटिजन व अ‍ॅँटिबॉडी टेस्टचे दर घटवून निश्चित करून दिल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

असे आहेत नवीन दर
प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास

  • आरटीपीसीआर : १९०० रुपये
  • अ‍ँटिजन टेस्ट : ६०० रुपये
  • अ‍ँटिबॉडी टेस्ट : ४५० ते ५०० रु.

हॉस्पिटल, कोविड केंद्रावरून स्वॅब घेतल्यास

  • आरटीपीसीआर : २२०० रुपये
  • अँटिजन टेस्ट : ७०० रुपये
  • अँटिबॉडी टेस्ट : ५०० ते ६०० रु.

लॅबने घरी जाऊन स्वॅब घेतल्यास

  • आरटीपीसीआर : २५०० रुपये
  • अँटिजन टेस्ट : ८०० रुपये
  • अँटिबॉडी टेस्ट : ६०० ते ७०० रु.
बातम्या आणखी आहेत...