आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:मिसारवाडीत कामगाराचा मृत्यू; कुटुंबीयांचा मारहाणीचा आरोप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिसारवाडी भागातील गणेश रमेश वाघ (२२) या तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. त्या वादानंतर त्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र, डोक्याला खरचटलेले असून मारहाणीमुळे मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात व्यक्त केला आहे.

खासगी काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारा गणेश मंगळवारी रात्री जेवण केल्यावर ९:३० वाजता मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्या वेळी तेथे काही महिलांचा सुरू असलेला वाद सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु, मध्यस्थी करू नको, असे म्हणत एका तरुणाने गणेशसोबत वाद घातला. त्यानंतर घरी गेलेल्या गणेशची प्रकृती खालावली व त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्याचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाद सुरू असतानाच मारहाण झाल्याने तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेशच्या नातेवाइकांनी केला. मात्र, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तसे स्पष्ट झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...