आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषद:भिंतीवरील चित्रांना लॅकर कोट, रात्री स्वच्छता मोहीम

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनिमित्त शहरात सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाची कामे करण्यात आली. ही कामे कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे नियाेजन मनपाकडून सुरू आहे. त्यानुसार भिंतीवरील चित्रांवर लॅकर कोट केला जाणार आहे. रात्रपाळीत स्वच्छता मोहीम राबवली जाईल. महिनाभरात रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, संरक्षण भिंतीवर चित्र काढणे, उड्डाणपुलांची रंगरंगोटी, कृत्रिम झाडे लावणे, ग्लो गार्डन उभारणे, जागोजागी कारंजे, मुख्य रस्त्यावर फुलांच्या कुंड्या लावण्यात आल्या.

आता हे सौंदर्यीकरण जपले जाणार आहे. सोमवारी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात घनकचरा व्यवस्थापनप्रमुख सोमनाथ जाधव यांनी रात्रीच्या शिफ्टमध्ये स्वच्छता आणि भिंतीवरील चित्रांना लॅकर कोट देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला. या चित्रांवर वारा, पाणी आणि धुळीचा कोणताही प्रभाव होऊ नये, त्यासाठी लॅकर कोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दिवसभर मुख्य रस्त्यांवर वर्दळ असल्यामुळे साफसफाई करण्यात अडचण येते. त्यासाठी रात्री स्वच्छता केली जाणार आहे.

नियमित पाणी देणार मुख्य रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली झाडे, कुंड्यातील फुलझाडे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे जगवण्यासाठी नियमित पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी टँकर आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे. एसटीपी प्लँटचे पाणी झाडांना दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...