आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लॉकडाऊनच्या काळात स्वच्छ झालेले तलाव गणेश विसर्जनानंतर प्रदुषीत, पर्यावरण प्रेमी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली सफाई

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: धनंजय ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वच्छ झालेले देवळाई परिसरातील दोन्ही तलाव गणेश विसर्जनानंतर म्हणजेच मंगळवारी गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्यांचे विसर्जन केल्याने प्रदुषीत झाले आहे. या बुडालेल्या गणेश मुर्त्या काढून पर्यावरण प्रेमी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुर्णपणे तलावाची स्वच्छता केली.

देवळाईसह सातारा परिसरातील तलाव यंदाच्या पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले आहेत. या भरलेल्या तलावात परिसरातील वन्य जीव तसेच गाय, म्हैस, कुत्रे यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा साठा आहे. हा परिसर वन विभागाने नागरिकांसाठी प्रतिबंधित केलेले क्षेत्र असल्यामुळे येथे तशी कमीच वर्दळ असते. परंतू कोरोनाच्या संसर्गामुळे केलेले लॉकडाऊन, परिसरातील निसर्गरम्य असा माहोल असल्याने प्रतिबंधीत केलेले क्षेत्र असूनही येथे मानवाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. परसिरातील दोन्ही तलावात आजुबाजुच्या डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्यामुळे खुप लवकर हे तलाव भरतात. परंतू आैरंगाबाद महानगर पालिकेने गणेश मुर्तींचे संकलन करण्यासाठी शहरातील सर्व वार्डांमध्ये वाहनाच्या माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. परंतू आजुबाजुच्या गणेश भक्तांनी मात्र गणेशाचे विसर्जन मनपाच्या संकलन वाहनाला दिले नाही. तर अनेक नागरिकांनी हा परिसर स्वच्छ तसेच निर्मनुष्य असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या चक्क या तलावात टाकल्या.

या प्रकाराची माहिती वनरक्षक गुसिंगे तसेच राठोड, वन्यजीव अभ्यासक आदी गुडे, पर्यावरण प्रेमी मनोज गायकवाड, सर्प मित्र सागर कसाब, सुनील पनाड यांना समजली. बुधवारी तलावातून मुर्त्या काढण्यासाठी लागणारे साहित्य घेवून या टीमने दोन्ही तलावात विसर्जित केलेल्या गणेश मुर्ती, निर्माल्य, फुले, कचरा, पुस्तके तसेच इतर पुजेचे साहित्य ४ तासांच्या कठीण परिश्रमानंतर काढले. या दोन्ही तलावाच्या आजुबाजुला शहरातील विविध उद्योग जगतात काम करणारे कामगार, अधिकारी वर्ग येथे सलग वृक्षारोपणाचे उपक्रम घेत असतात. त्यामुळे परिसरामध्ये हिरवागार निसर्ग देखील वाढला आहे. वन्य प्राण्यांना येथील अधिवास आवडतो. म्हणूनच येथे पाणी पिण्यासाठी परिसरातील वन्य जीव मोठ्या प्रमाणात येतात.

तलावातून बाहेर काढलेले साहित्य

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या, पुजेचे साहित्य, फुलांच्या माळा, नारळ, सफरचंद, मोसंबी, केळी, उदबत्ती, जुने धार्मिक पुस्तक, झिरमाळ्या, मोताचे हार, गुलाल, मक्याचे कणीससह विविध डेकोरेशनसाठी लागणारे साहित्यांचा समावेश होता.

तलावातून बाहेर काढलेल्या गणेश मुर्तीची सुरक्षितपणे लावली विल्हेवाट

दोन्ही तलावातून अंदाजे २०० प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या, २०० किलोचे निर्माल्यही काढले. या मुर्त्या, निर्माल्य सुरक्षितपणे एका जागेवर जमा करुन पुन्हा तलावात मिसळू नये, म्हणून छोटे खानी असलेल्या परंतू वापरात नसलेल्या तलावात विल्हेवाट लावली.

प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दिली समज

हा सर्व परिसर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने प्रतिबंधित केलेला आहे. परंतू परिसरातील विद्यार्थी, नागरिकांसह महिला, पर्यटक येथे मोकळी हवा खाण्यासाठी येतात. या वेळी मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जल घातल होते, त्यांना मात्र तलावातील काढलेला काडी, कचरा गोळा करणे, तलावातून काढलेल्या जमा झालेल्या गणेश मुर्ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यासाठी शिक्षा दिली.

बातम्या आणखी आहेत...