आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लाखमोलाचे ‘बी’, कांद्याच्या फुलांनी पांघरली पांढरी चादर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
छाया : रवी खंडाळकर

शहराजवळील कुंभेफळ येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले आहे. कांद्याच्या फुलांच्या पाकळ्यांवर तयार होत असलेले कांद्याचे ‘बी’ पांढरी चादर पांघरल्यासारखे दिसत आहे. कांदा शेतकऱ्यांना कधी हसवतो तर कधी रडवतो. काळ्या रंगाचे हे बियाणे उपलब्धतेनुसार भाव खात असते.

गावरान कांद्याच्या बियाण्याची जवळपास ७५ ते ८० हजार रुपये क्विंटल दराने विक्री होते. फुलांवर असलेले हे कांद्याचे बी दीड महिन्यात परिपक्व होऊन विक्रीसाठी सज्ज होईल. त्याआधी वादळ, पाऊस येऊ नये, अशी प्रार्थना शेतकरी करत असतात. या भीतीने त्याची लागवड घटते आणि दर वाढत जातो. साधारण एक एकरमध्ये १५ ते २० क्विंटल कांदा निघत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...