आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास, तिघांना कोठडी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-३ भागातील कंत्राटदाराचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील तिघांच्या गुन्हे शाखेने गडचिरोली, चंद्रपुर येथून मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या टिकावासह ८ लाख २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी मंगळवारी दिले.लिगन्‍ना शालीक मन्नेकर (३०), दारासिंग हिरा बदकल (२९, दोघे रा. ता. बरोर जि. चंद्रपुर) आणि व्यकंटी रामा गोडमारे (३८, रा. विशिंवार्ड देसाईगंज ता. वडसा जि. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी साथीदार चंदू ईरा बदकल (रा. राजूनगर, हिंगणा रोड, नागपुर) आणि संगीता बंटी लालोरकर (रा. ता. वारोरा जि. चंद्रपुर) यांनी मिळून घरफोडी करण्याची कबुली दिली.चोरीचे दागिने नंदकिशोर बाबुराव गजापुरे (५०, रा. देसाईगंज, गडचिरोली) याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...