आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:लालबहादूर शास्त्री, म. गांधी यांची जयंती साजरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी १० वाजता पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

या वेळी मनपाचे मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, शिक्षणाधिकारी संजीव सोनार, सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, वॉर्ड अभियंता काटकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती. मनपा मुख्यालयात लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, वॉर्ड अभियंता काटकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...