आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगाम:बंगळुरूहून आला लालबाग जातीचा आंबा; 400 रुपये किलोने विक्री

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आंबा विक्रेत्यांनी बंगळुरू येथून हंगामबाह्य ५० किलो लालबाग जातीचा आंबा विक्रीसाठी आणला आहे. आंब्याचे वजन २०० ग्रॅम आहे. चवीला गोड, आंबट, तुरट आहे. आवक कमी व हंगाम नसल्याने सध्या ४०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. लालबाग, निरंजन जातीचे आंबे वर्षांतून दोन वेळा येतात. दिवाळीनंतर बिगरहंगामी आंबा उपलब्ध होताे. परंतु उन्हाळी हंगामात जी अवीट गोडी असते, ती हिवाळ्यात येणाऱ्या आंब्यात मिळत नाही. जटवाडा परिसरात सध्या लागवड केलेल्या आंब्यांना सध्या बिगर हंगामी वाणाचे आंबे लगडले आहेत. याला जुलै व ऑगस्टमध्ये मोहर लागतो. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ते काढणीस येतात. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मोहोर लगडताे आणि मार्च ते जूनअखेरपर्यंत उन्हाळ्यात आंबा विक्री होतो, अशी माहिती बदनापूर येथील मोसंबी फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...