आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन संपादन:शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी जमीन संपादनाचे आदेश ; रेल्वेने तातडीने हा प्रश्न निकाली काढावा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर रेल्वे गेटच्या भुयारी मार्गासाठी मनपाकडून जमिनीचे संपादन होत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १७ जून रोजी जमीन भूसंपादनाचे आदेश काढले. सातारा-देवळाई भागासह बीड बायपास मार्गावर जाण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे गेट ओलांडून जावे लागते. रेल्वे आल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांचा रांगा लागून वाहतूक ठप्प होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयाने महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वेने तातडीने हा प्रश्न निकाली काढावा असे आदेश दिले होते. मात्र, भूसंपादन होत नसल्याने सहा महिने हे काम प्रलंबित राहिले. अखेर १७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यास शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले. सा.बां. विभागाने भूसंपादनासाठी मनपाला १ कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तिन्ही विभागांनी जमिनीची मोजणी करून मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे म्हणाले, बाधित ७ ते ८ जमीन मालकांना नोटिसा बजावल्या जातील. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल.

बातम्या आणखी आहेत...