आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:गोळेगाव येथे जागेचा वाद, दोन गटांत तुंबळ हाणामारी ; बारा जणांवर गुन्हा दाखल, सात जण अटकेत

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गोळेगाव येथे सहान जागेवरून भाऊबंद असलेल्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली असून दोन्ही गटाने परस्पर दिलेल्या तक्रारींवरून दोन्ही गटांतील किमान १२ जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या विषयी खुलताबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोळेगाव येथे एका सहान जागेवरून बुधवार रोजी रात्री भाऊबंद असलेल्या दोन गटांत लाठ्या-काठ्याने तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या असून दोन्ही गटांतील फिर्यादीने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. एका गटातील ताराबाई दादाराव देहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाकर लक्ष्मण देहाडे, विनोद प्रभाकर देहाडे, अमोल प्रभाकर देहाडे, भास्कर उमाजी वाहूळ, शिंदूबाई देहाडे, रिताली देहाडे, दुर्फतभाई जाधव, मंदा वाहूळ अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील मंदाबाई भास्कर वाहूळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरुण दादाराव देहाडे, दादाराव लक्ष्मण देहाडे, सागर दादाराव देहाडे, ताराबाई देहाडे अशा ४ जणांवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बहुरेकरीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...