आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना अटक:भूकरमापक अधिकाऱ्यासह एकाला लाच घेताना अटक

घाटंजी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावठाणपासून शेतजमिनीच्या अंतराबाबतचा अहवाल लवकर देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या भूकरमापकासह एका खासगी व्यक्तीला दहा हजार रुपयांची लाच घेताना २४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई नगर परिषदेजवळील कॅन्टीन परिसरात अमरावती लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. भूकरमापक राजीकोद्दीन नाझीकोद्दीन काझी (३९) आणि रामचंद्र दशरथ किनाके (३८, रा. बोदडी) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदाराची शेतजमीन गावठाणपासून काही मीटर अंतरावर आहे. दोन्हीच्या अंतराची मोजणी करून घाटंजी तहसीलदारांना अहवाल सादर करावयाचा होता. त्या अनुषंगाने तक्रारदाराने घाटंजी भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र, ही मोजणी करण्याकरता उपअधीक्षक कार्यालयातील भूकरमापक राजिकोद्दीन नाझिमोद्दीन काझी यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. यामुळे तक्रारदाराने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अमरावती येथे लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...