आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लंगर:26 वर्षांत प्रथमच खंडित ‘सचखंड’च्या लंगरची मनमाड स्थानकात आजपासून पुन्हा सेवा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृतसर- नांदेड एक्स्प्रेस रेल्वेतील २ हजार प्रवाशांना राेज मनमाड स्थानकावर मिळते भाेजन

सतीश वैराळकर 

शिख समाजाचे धर्मगुरू श्री गुरु नानकदेव जी साहेब यांनी भुकेल्यांना अन्न मिळावे यासाठी लंगरची संकल्पना सुरू केली. गेल्या २६ वर्षांपासून मनमाडच्या गुरुव्दारा गुपतसर साहेबच्या वतीने अमृतसर ते नांदेड सचखंड एक्सप्रेसमधील भाविक व प्रवाशांसाठी मनमाड स्थानकावर लंगर नियमित सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सुमारे ७० दिवस ही रेल्वेगाडी बंद असल्यामुळे लंगरमध्येही खंड पडला. मात्र आता गुरुवार (४ जून) पासून ही लंगरसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

दि. १ जून पासून सचखंड रेल्वे पुन्हा सुरू झाली. आता परतीच्या प्रवासात ३ जून राेजी अमृतसरहून निघालेल्या या गाडीचे ४ जून राेजी सकाळी ९.३० वाजता मनमाड स्थानकावर आगमन हाेणार आहे. तेव्हा ‘वाहे गुरू दा खालसा ’चा जयघोष पुन्हा एकदा घुमणार असून लंगरसेवाही सुरू हाेणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात गुरुव्दारा गुपतसर साहेबच्या वतीने श्रमिक एक्सप्रेस व गरजूंसाठी अन्नदान करण्यात आले.अमृतसरहून येताना जेव्हा ही गाडी मनमाड स्थानकावर थांबते तेव्हा शीख समाजातील सेवेकरी अतिशय सन्मानाने प्रवाशांना खाली उतरण्याचे आवाहन करतात आणि प्रत्येकाला प्रसादाचा लाभ घेण्याची विनंती करतात. सुमारे २ हजार भाविक व प्रवासी दरराेज या प्रसादाचा लाभ घेत आले आहेत.

नांदेड, खांडवा येथेही लंगरची साेय : नांदेड येथे सकाळी ९.३० वाजता लंगर असतो. तर रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान खांडवा स्थानकावर लंगरची सुविधा आहे. सकाळी आग्रा ते दिल्ली दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२.३० एवढा मोठा कालावधी लंगरच्या सुविधेसाठी ठेवला असून त्यासाठी रेल्वेची गती कमी केली जाते.परतीच्या प्रवासात अमृतसर येथून निघाल्यानंतर अंबाला ते दिल्ली दरम्यान लंगर असतो. सकाळी ९.३० वाजता मनमाड येथे लंगर आहे.

श्रमिक एक्स्प्रेसमध्ये ३४ हजार नागरिकांना अन्नदान

लॉकडाऊनच्या काळात सचखंड एक्सप्रेस बंद असली तरी श्रमिक एक्सप्रेस मधील मजुरांसह शहरातील गरजू अशा ३४ हजार लोकांना आमच्याकडून अन्नदान सुरू हाेते.तसेच शेजारच्या प्लॅटफॉर्मवरील इतर रेल्वेतील प्रवासीही लंगरचा लाभ घेतात. या प्रवाशांच्या अन्नदानानंतरही उरलेले अन्न प्लॅटफॉर्म , शहरातील गरजूंना दिले जाते. - बाबा रणजितसिंह,प्रबंधक जथ्थेदार,गुरुद्वारा गुपतसर साहेब

लंगरचा रोजचा मेन्यू

18 क्विंटल भात

04 क्विंटल वरण

एवढे अन्नदान केले जाते. याशिवाय बेसन कढी, पांढरा चना, काळा चना, आलूवडी, राजमा आदी पदार्थ असतात.

0