आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँक परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम बन्सवाल (२६) याला फसवून रिक्षाचालकाने त्याची लॅपटॉप व मोबाइल असलेली बॅग लंपास केली होती. गुन्हे शाखेने रिक्षा क्रमांकावरून चालकाचा शोध घेत चार दिवसांत शुभमची बॅग व साहित्य पुन्हा मिळवून दिले. गणेश नंदू पाटील (३६) आणि सुनील बाबूराव खोतकर (दोघेही रा. मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. शुभम हा ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोकणवाडीतून सिडको बसस्थानकाकडे रिक्षाने (एमएच २० बीटी ८८२८) जात होता. तेव्हा सिडको चौकात चालकाने थोडे चालत या, समोर वाहतूक पोलिस आहे, असे सांगितले. तेव्हा शुभमची लॅपटॉप व मोबाइल असलेली बॅग रिक्षातच होती. शुभम समोर गेल्यानंतर रिक्षाचालक वेगाने निघून गेला. त्यानंतर शुभमने पोलिसांत तक्रार दिली. १० जून रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने जयभवानी पेट्रोल पंपाजवळ लॅपटॉप व मोबाइल विकण्यासाठी आलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.