आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणव तेचले द्वितीय, मोहंमद युनूस तृतीय:जनरल नॉलेज स्पर्धेत नशरा समीनला लॅपटॉप

छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्दिकी वेल्फेअर संस्थेअंतर्गत ग्लोबल मेडिकल फाउंडेशन व आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जनरल नॉलेज स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक लॅपटॉप मिळवण्याचा मान नशरा समीन अब्दुल मुकीद या पाचवीतील विद्यार्थिनीला मिळाला. द्वितीय पारितोषिक प्रणव तेचले यास रेफ्रिजरेटर मिळाले. तृतीय पारितोषिक सायकल मोहंमद युनूस युसूफ याला देण्यात आली.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात ७ मार्च रोजी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी पोलिस उपायुक्त बालाजी सोनटक्के होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खूप शिका, देशाचे भविष्य उज्ज्वल करा, असा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारुकी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. डॉ. इश्तियाक अन्सारी, इक्बाल सिद्दिकी यांचीही या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...