आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदी महोत्सव:स्मिता हॉलिडेजच्या शॉपिंग कार्निव्हल ‘बंपर लकी ड्रॉ’च्या लता गवई विजेत्या

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठी आणि स्मिता हॉलिडेजच्या वतीने दसरा ते दिवाळीच्या काळात औरंगाबादेतील सर्वात मोठा शॉपिंग कार्निव्हल घेतला होता. ४० दालने, व्यावसायिक त्यात सहभागी झाले होते. या दालनात खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कुपन भरण्यास सांगितले जात होते. या सर्व कुपन्सचा बंपर लकी ड्रॉ १८ नोव्हेंबर रोजी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात करण्यात आला. विजेत्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयातील सचिन शेडुते (९७६७२७०६९१) यांच्याशी सकाळी १० ते ३ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

दिव्य मराठीचे युनिट हेड बेंजामिन रॉक यांनी प्रास्ताविक केले. मुख्य प्रायोजक स्मिता जयंत गोरे (संचालिका, स्मिता हॉलिडेज), शिवप्रसाद मुंदडा (स्वाती फर्निचर), पंकज अग्रवाल (सानिया डिस्ट्रिब्युटर्स), किशोर काल्डा (राजदरबार मेन्स), संदीप कृपलानी (रंगोली), श्रीकांत सराफ (सोनपरी), डॉ. प्रतीक छाजेड (मणिभद्र ट्रेडर्स), राहुल शास्त्री (सोनरूपम), दर्शन पारसवाणी (सुजाता इलेक्ट्रॉनिक्स), सुमीत पहलाजानी (अमर एजन्सी), लक्ष्मण सावनानी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स), श्रीनिवास जाधव (अरुण इलेक्ट्रॉनिक्स), हरप्रीत छाबडा (प्रतीक डिजिटल वर्ल्ड) यांची उपस्थिती होती.

‘औरंगाबाद दर्शन’ची बस लवकरच सुरू करू दिव्य मराठी आणि स्मिता हॉलिडेज‌च्या या शॉपिंग कार्निव्हलला भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्याकडेही अनेक बुकिंग वाढल्या. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही लवकरच पर्यटकांसाठी ‘औरंगाबाद दर्शन’ची विशेष बस सुरू करू. डोमेस्टिक व इंटरनॅशनल फ्लाइट्स वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग, महिला, ग्रामीण महिला आदींसाठी विमानफेरी आदी सामाजिक आमचे उपक्रम सुरूच राहतील. मराठवाडा टुरिझम विशेष पॅकेज भविष्यात आखणार आहोत. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग आदी उपक्रम राबवू. ख्रिसमसनिमित्त स्पेशल ग्रुप टूर केरळ, राजस्थान, दुबई, अंदमान टूर आहेत. ऑन द स्पॉट बुकिंग करणाऱ्याला सवलतही देणार आहोत. - स्मिता गोरे, संचालिका, स्मिता हॉलिडेज

बातम्या आणखी आहेत...