आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थीनींच्या बाबती घडणाऱ्या शहरातील घटना पाहता. मुलींना वाईट प्रसंगात विरोध करता यावा. त्यांनी वेळप्रसंगी स्वत:चे रक्षण स्वत: करावे. या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत मंगळवार पासून खास विद्यार्थीनींसाठी लाठी-काठी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
मुलींना आता काळानुरुप शिक्षणाबरोबरच त्यांनी स्वत:चे रक्षण करण्याचे शिक्षण घेणे देखील आवश्यक होत चालले आहे. याचे कारण सध्या औरंगाबाद येथील शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना सक्षम बनविण्याच्या अनुषंगाने जनहितकक्षाच्या विधी विभागाचे उपशहरसंघटक अमित जयस्वाल व स्वामी समर्थ केंद्र, बजाज नगरचे किशोर पांढरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर माध्यमिक शालेय विद्यार्थिनींना कराटे, लाठीकाठी,दंड साखळी यांचे प्रशिक्षण प्रशालेत सुरू केले आहे. यात मंगळवारी आठवी आणि नववीच्या ७० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लाठीकाठी व दंड साखळी यांचे प्रशिक्षण अत्यंत उत्साहाने घेतले. त्यांचा उत्साह बघता शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे व क्रीडा शिक्षिका हेमलता पवार यांनी प्रशालेच्या सर्व मुलींना हे प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगितले.
प्रशालेच्या या उपक्रमाबद्दल प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष सुहास पानसे , उपमुख्याध्यापिका वंदना रसाळ दोन्ही विभागांच्या पर्यवेक्षिका अलका भंगाळे व शोभा बोरीकर तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
शिक्षिका वंदना रसाळ म्हणाल्या की, मुलींना सक्षम करणे आणि वेळप्रसंगी त्यांना विरोध करता यावा. आपले संरक्षण आपण करावे. या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गाला एक महिना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.