आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर:होम क्वारंटाईन होण्यावरुन झालेल्या वादातून जिल्ह्यात दोघांचा खून

लातूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत

मुंबईला राहणाऱ्या आणि नुकताच गुजरातमधून ट्रकद्वारे आलेल्या व्यक्तीला घरातच विलग राहण्यास (होम क्वारंटाईन ) सांगितल्याच्या रागातून झालेल्या हाणामारीत दोघांचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी पहाटे लातूर जिल्ह्यातील बोळेगाव (ता. निलंगा) येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोळेगावचा मूळ रहिवासी असलेला विद्यावान बरमदे कामानिमित्त मुंबईत राहतो. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातहून ट्रक घेऊन बोळेगावमध्ये दाखल झाला. गावातील लोकांनी त्याला घरातच विलगीकरण करून राहण्यास सूचवले. परंतू तो दिवसभर गावात इतरत्र फिरत असल्यामुळे गावातील लोकांनी त्याला हटकले. त्याचा राग आल्याने बरमदे याने रविवारी पहाटे त्यांच्या घरी जाऊन चाकूने वार केले. त्यामध्ये शहाजी पाटील आणि त्यांचा पुतण्या वैभव पाटील जागीच मृत्यूमुखी पडले.

घटनेत साहर शहाजी पाटील आणि श्रीधर चंदर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उमरगाच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की विद्यवान बरमदे यासह सहाजण आरोपी असून सायंकाळपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  कासारशिरसी पोलिस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, अतिरीक्त पोलिस अधीक्षक हिंमत्त जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेमागची कारणे जाणून घेतली.

बातम्या आणखी आहेत...