आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:सत्र न्यायालयाच्या पार्किंगला वकील महासंघाचा विरोध

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने सिडकोतील कॅनॉट आणि अदालत रोडवरील सत्र न्यायालयाच्या जागेसमोर पे अँड पार्किंग सुरू केली आहे. आतापर्यंत ही पार्किंग वकील महासंघ चालवत होते. यापुढेही आम्हीच चालवू, अशी भूमिका वकील महासंघाने घेतली आहे. दुसरीकडे रस्ता रुंदीकरणानंतर ही जागा मनपाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आम्हीच ही पार्किंग चालवू, असा पवित्रा मनपाने घेतला आहे.

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मनपा आणि स्मार्ट सिटीकडून सात ठिकाणी पे अँड पार्क योजना सुरू करण्यात आली आहे. याचे कंत्राट कर्बलेट या ठेकेदार कंपनीला दिले आहे. मागच्या महिन्यात सत्र न्यायालयासमोर सुरू केलेली पार्किंग दोन दिवस नीट चालली. त्यानंतर वकील महासंघाने यावर आक्षेप घेतला. त्यांचे कर्मचारी या ठिकाणाहून आमच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागले. याबाबत वेदांतनगर पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे, असे कर्बलेटचे संचालक स्नेहलचंद्र सलगरकर यांनी सांगितले.

ही जागा मनपाची : रस्ता रुंदीकरणानंतर जी जागा रस्त्यालगत शिल्लक राहते ती मनपाचीच असते, असे अॅक्टमध्ये नमूद आहे. याबाबत न्यायालयाशी देखील चर्चा झाली. त्यांनी ही आमची जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे मनपाने पे पार्क उपक्रम सुरू केल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...