आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद खंडपीठाने शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी खंडपीठ वकील संघाला निर्देश दिले होते. त्यानुसार खंडपीठ वकील संघाने शहरातील विविध भागांत जाऊन पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेतली. या वेळी अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी, सचिव अॅड. सुहास उरगुंडे यांनी पाणीपुरवठ्यासंबंधी वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या. अनेक भागात पाचव्या, सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले. सातारा-देवळाई भागात तर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. टँकरची रक्कम भरूनही अनेक ठिकाणी वेळेवर टँकर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठ सातत्याने मनपा प्रशासनाला विचारणा करत आहे. मनपाने खंडपीठाच्या निर्देशानुसार ६०:४० चा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर १ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. खंडपीठ वकील संघाच्या वतीने पाणीपुरवठ्यासंबंधी पाठपुरावा करण्यात आला. एसटी कॉलनी येथील अॅड. संतोष डांबे यांच्याकडे सहाव्या दिवशी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उत्तरानगरी चिकलठाणा परिसरातील अॅड. संतोष मोरमपल्ले म्हणाले, या पाचव्या दिवशी केवळ ३० मिनिटे पाणी येते. आम्हाला चौघांना पाणी पुरत नाही.
रक्कम भरूनही टँकर वेळेवर मिळत नाही सातारा-देवळाई परिसर २०१६ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला. या परिसरातील प्रत्येकाला बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. उन्हाळ्यात बोअरचे पाणी संपते. मनपाने अलीकडे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले, परंतु ते नियमित येत नाही. -अॅड. शिवराज कडू, सातारा परिसर
महिन्याला आठ टँकर घेतो विद्यानगर येथील सुंदर हाइट्समध्ये राहतो. उन्हाळ्यात महिन्याला आठ टँकर घ्यावे लागतात. पाणीपट्टी भरूनही अतिरिक्त खर्च होतो. -अॅड. विद्या कोठुळे-उरगुंडे
पाणी साठवता येत नाही ठाकरेनगर या व्हीआयपी भागात सहाव्या दिवशी कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे संचय करता येत नाही. -अॅड. चैतन्य देशपांडे, ठाकरेनगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.