आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा वकील संघातर्फे अॅडव्होकेट राज्यस्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २३ ते ३० डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादला तिसऱ्यांदा या स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला. स्पर्धेत गोवा व महाराष्ट्रातील एकूण ९४ संघ सहभागी होत असल्याची माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कैलास बगनावत व सचिव अॅड. योगेश फाटके यांनी पत्रकार परिषदेत दिली. बगनावत म्हणाले, या स्पर्धेत औरंगाबादचे ४ संघ खेळणार आहेत. सहभागी संघांची ३२ गटांत विभागणी केली आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवली जाईल. प्रत्येक दिवशी एका मैदानावर २ सामने होतील. सर्व संघ कलर ड्रेसवर असतील. विजेत्या संघांना रोख व चषक देण्यात येणार आहे. अंतिम सामना गरवारे संकुलावर खेळवला जाईल. सर्व मैदानावर एमजीएमचे २ वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहतील. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त निखिल गुप्ता व मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील एकूण १६ मैदानांवर होणार सामने स्पर्धा सचिव अॅड. संजय डोंगरे यांनी म्हटले की, या स्पर्धेतील सामने एकूण १६ मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. शहरात प्रथमच एकाच स्पर्धेसाठी जवळपास सर्व मैदानांवर सामने होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मैदानावरील एकूण ८ टर्फ आणि ८ मॅटच्या खेळपट्टीवर सामने पार पडतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.