आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता रद्द:शालार्थ आयडी रद्दच्या कारवाईत हलगर्जीपणा ; अधिकाऱ्यांवर कारवाई करणार : शिक्षण संचालनालय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी मान्यता रद्द करण्याचे आदेश करण्याच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक संचालनालयाला सादर न करता हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कसूर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षण संचालनालयाने दिला आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना पत्र दिले आहे.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यात मंत्र्यांच्या मुलांची नावे असल्याचेही समाेर आले हाेते. त्यानंतर आता परिषदेकडून टीईटीत गैरप्रकार केलेल्या ७,८७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यातील काही उमेदवार शिक्षकपदी कार्यरत आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करून विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द करण्याची प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

त्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील यादीत प्राथमिक १२०, तर माध्यमिकच्या २९ शिक्षकांची नावे होती. त्यांचे शिक्षण विभागाने वेतन रोखले आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली. तसेच प्राथमिकच्या शिक्षकांचेही वेतन रोखल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...