आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सुचना दिल्या नाही - पैठण बीडीओ:शिंदेंच्या सभेला गर्दी होणार नसल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावले; अंबादास दानवेंची टीका

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारा तारखेला पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व पर्यवेक्षीका तसेच 42 गावातील अंगणवाड्यामधील सेवीका मदतनीस यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या बाबत गट विकास अधिकाऱ्यांनी सुचना केली असल्याचे पत्र त्यांनी व्हायरल केले आहे.

बारा तारखेला एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. त्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी संदीपान भुमरेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.मात्र सभेच्या अगोदरच विरोधी पक्षनेत्यांनी या सभेच्या गर्दी जमवण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.

काय आहे पत्रात सुचना

बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प औरंगाबाद २ यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आले आहे. गट विकास अधिकारी पंचायत समिती औरंगाबाद यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्स मधील सुचनेनुसार पैठणमध्ये मुख्यमंत्र्याची सभा आयोजित केली असून आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षीका तसेच 42 गावातील अंगणवाड्या सेवीका मदतनीस यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अश्या गटविकास अधिकारी यांच्या सुचना आहेत. सकाळी दहा वाजता या कार्यक्रमा उपस्थित रहावे असे या पत्रात कळवण्यात आले आहे.

गर्दीसाठी पैशाचे अमीष

दानवे म्हणाले की शासकीय यंत्रणाचा गैरवापर हा गर्दी जमत नसल्यामुळेच केला जात आहे.पैशाचे अमीष दाखवून गर्दी जमा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. लोक येणार नाहीत हे कळत असल्यामुळे असा प्रकार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले की असले कुठलेही प्रकार आम्ही करत नाही. अंबादास दानवे काहीही करतात. कुठलेही पत्र ट्वीट करत राहतात. कर्मचाऱ्यांना बोलावणे आणि गर्दी करणे हा माझा स्वभाव नाही. पैठणमधली सभेची गर्दीही भव्य राहणार असून तीस वर्षात सभेला गर्दी झाली अशी गर्दी जमणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही सुचना दिल्या नाही

आम्ही असे कुठलेही पत्र दिले नाही. या पत्रात तीन चुका आहेत. या पत्रामध्ये 12 फेब्रुवारी 2022 अशी तारीख आहे तसेच यावर कुठलाही जावक क्रमांक नाही आणि सभा दुपारी दोन वाजता असताना या पत्रामध्ये दहा वाजता हजर राहण्याचे सूचना लिहिलेल्या आहेत त्यामुळे या पत्राची पडताळणी करण्यात येईल अशी माहिती पैठणचे गटविकास अधिकारी ओम रामावत यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली आहे.तसेच या प्रकरणात पडताळणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिली आहे

बातम्या आणखी आहेत...