आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:नशामुक्तीसाठी नेते, उलेमा कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नशेच्या आहारी जाऊन युवा पिढी एकीकडे बरबाद होत आहे, तर दुसरीकडे नशेतून खून करण्यासारख्या घटना वाढत चालल्या आहेत. हे रोखण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि उलेमा यांची बैठक रविवारी रोषन गेटशेजारील अब्बास फंक्शन हाॅलमध्ये झाली. त्यात शहर स्तरावर एक तसेच मोहल्लानिहाय समित्या गठित करण्याचे निश्चित करण्यात आले. वॉर्डनिहाय पालक आणि मुले यांच्यात समन्वय साधून नशामुक्तीसाठी काम करण्याचा निर्धार करण्यात आला.इमारत-ए-शरियाचे अमीर ए शरीयत मुफ्ती मोइज कास्मी, मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी, संपादक शोएब खुसरो, नायब अन्सारी, डॉ. गफ्फार कादरी, नासेर सिद्दिकी, बॅरिस्टर उमर फारूकी, कमाल फारूकी, अफसर खान, अॅड. मौलाना अन्वर इशाती, विकास येडके, तय्यब जफर , मौलाना महफूर्रज रहेेमान, जावेद कुरेशी, हिशाम उस्मानी, सोहेल जलील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...