आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:मसिआकडून 70 महिलांना नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण ; ‘मी कशी घडले’ याविषयी मार्गदर्शन

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (मसिआ) वुमन आंत्रप्रेन्योरशिप सेलअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सलील पेंडसे यांनी ‘सप्तपदी - गुरुकिल्ली उत्तम नेतृत्वाची’ विषयावर, तर उद्योजिका राजश्री कुलकर्णी यांनी ‘मी कशी घडले’ याविषयी मार्गदर्शन केले. ७० महिलांचा सहभाग होता. समन्वयक रत्नप्रभा शिंदे म्हणाल्या, महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून त्याचा वापर उद्योगात करावा.’ सलील पेंडसे म्हणाले, नेतृत्व करणारी व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांचे कौशल्य ओळखून त्यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करते. राजश्री यांनी उद्योजिका म्हणून आजपर्यंतचा प्रवास कथन केला. उद्योग चालवण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असते, असा सल्ला त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...