आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयवर्धन इंगळेच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा नेटबाॅल संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नागपूरला रवाना झाला आहे. जिल्हा संघटनेचे सचिव तथा राष्ट्रीय पंच सतिश इंगळे यांची पंच प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघामध्ये जयवर्धनच्या नेतृत्वात अनिल वाघमारे, हर्षवर्धन मगरे, विक्रमसिंग कायटे, विक्की शेजूळ, अतुल पगडे, आकाश सरदार, सनी देहाडे, प्रशांत साबळे, रितेश प्रधान, सचिन कुलभैय्या, अबु तालिब अन्सारी खेळणार आहेत. संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश प्रधान व व्यवस्थापकपदी धर्मेंद्र काळे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.