आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी गळती सुरू:रबर पॅकिंग खराब झाल्याने बोरदहेगाव प्रकल्पातून गळती

बोरदहेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव मध्यम प्रकल्प १९९८ मध्ये पूर्ण झाला. पण पुरेसा पाऊस नसल्याने तो आतापर्यंत फक्त चार वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यंदा प्रचंड पाऊस असूनही हा प्रकल्प फक्त ३७.४०% इतकाच भरलेला आहे. त्या मागे एक कारण गाळ वाढला असे सांगितले जात असूून दुसरे कारण रबर पॅकिंग खराब झाल्याचे आहे. पॅकिंग खराब झाल्याने पाणी गळती सुरू आहे. यंदा सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने ३७.४० टक्केच जलसाठा झाला. पण प्रकल्पाच्या सर्व सहा दरवाजांचे रबर पॅकिंग खराब झाल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी नदीपात्रात जात आहे. ही गळती रोखण्याची मागणी बोरदहेगाव, गोलवाडी, बेंदवाडी, करंजगाव, परसोडा, पालखेड, शिवराई येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...