आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:पक्ष्यांच्या स्वछंद जगण्यातून मिळतेय कोरोनावर मात करायची शिकवण

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्याची चिंता असली तरी उभारी घेण्याची हिच वेळ

नितीन पोटलाशेरू 

  • संकटात एकमेकांना सहाय्य करा

रंगीत करकोचा, चित्रबलाक (Painted Stork)

नाथसागरावर आढळतो. लांब चोच. दलदलीतील किडे, मासे, बेडूक, पाण्यातील साप खातो. घरटी एकमेकांना चिटकून असतात. समुहाने राहतो.

शिकवण : लॉकडाऊनमध्ये प्रत्येक व्यक्ती संघर्ष करतोय. पण समुहाने राहणाऱ्या रंगीत करकोच्याप्रमाणे एकमेकांना सहाय्य केल्यास संकटावर मात करता येईल.

  • मिळेल ती संधी पटकन स्वीकारा

नदीसुरय (Riverturn)

जायकवाडीच्या छोट्या बेटांवर मे, जून महिन्याच्या दरम्यान त्याच्या वीणीचा हंगाम (Breeding). उडताना माशांवर नजर ठेऊन क्षणात भक्ष्य उचलून हवेत भरारी घेतो.

शिकवण : लॉकडाऊनमुळे खूप लोकांचा रोजगार गेला. अशा वेळी बाजारात कुठलीही छोटी, मोठी संधी मिळाल्यास जास्त चिकित्सा करत बसू नका. ज्या पद्धतीने नदीसुरय पाण्यात सूर मारून मासा पटकन उचलतो तसे नोकरीची संधी स्वीकारा.

  • काम नगण्य तरी फायदा अनेकांना

मोर शराटी किंवा चिकना कुदळ्या (Glossy Ibis)

मुख्य अन्न शंख, शिंपले, किटक हे आहे. दलदलीच्या भागात तो लांब चोचीने पाणथळ जागेवर खोलवर असलेले खेकडे ओढून काढतो. त्यामुळे या जागेमध्ये छोटे छोटे छिद्र होतात.

शिकवण : पाणथळ जागेवर छिद्र करण्याचे काम नगण्य वाटते, पण त्या छिद्रावाटे पाणी जमिनीत मुरल्याने याचा अनेकांना फायदा होतो. त्यामुळे एखाद्या कामातून आपणाला काय मिळेल याचा विचार न सतत कार्यमग्न राहणेच योग्य.

  • चांगल्या, वाईटातील फरक ओळखा

गुलाबी पायाचा शेकट्या (Black-Winged Stilt)

स्थानिक व स्थलांतरीत पक्षी आहे. तलाव वा पाणथळ, दलदलीच्या भागात तो आढळतो. किडे हे त्याचे भक्ष्य. शुद्ध पाण्याच्या ठिकाणी जेथे अशुद्ध पाणी मिसळते तेथे तो दिसतो.

शिकवण : शुद्ध-अशुद्ध पाण्याचे ठिकाण ओळखण्यासाठी जशी शेकट्याची मदत होते. तसेे कोरोना संकट काळात अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा आपण सामना करत आहे. हा फरक ओळखून मार्गक्रमण केल्यास पुढे त्याचा फायदा होईल.

  • फिजिकल डिस्टन्स ठेवा पण नेहमी सोबतच राहा

पट्ट कादंब(Bar Headed Goose)

दरवर्षी हिवाळ्यात हा पक्षी हिमालयातून उड्डाण करतो. तो V आकारात थव्याने उडतो. तळ्याच्या काठावरील कोवळी पाने, कोवळे पिक त्याचे मुख्य खाद्य. तो सावध पक्षी म्हणूनही ओळखला जातो.

शिकवण : आकाशात शेकडोंच्या संख्येने एकत्र एका लयीत उडतात. त्याप्रमाणे सध्याच्या काळात एकमेकांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवायचा तर आहेच, पण सुख दु:खात एकमेकांची साथ सोडायची नाही.

छाया : नितीन सोनवणे, बैजू पाटील

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser