आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित उपक्रमांचे स्वागत:वेरूळ लेणी, औरंगाबाद लेणीच्या इतिहासाबद्दल माहिती मिळाली

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संविधान दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाकडून चार दिवस मोफत सहलीचे आयोजन केले होते. या उपक्रमातून वेरूळ लेण्यातील शिल्पांच्या पाठीमागील इतिहास समजून घेता आला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त होत आहेत.

पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित सहलीत ७ डिसेंबर रोजी ९७ पर्यटकांना घेऊन बस निघाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानंतर औरंगाबाद लेणी येथून मिलिंद कॉलेजपर्यंत सहल काढण्यात आली. यासाठी मार्गदर्शक म्हणून किरण गाडेकर व अपर्णा गायकवाड यांनी गाइड म्हणून पर्यटकांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहलीसाठी पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, उपअभियंता अभिषेक मुदिराज, सपना इंदापुरे यांनी काम पाहिले. ८ रोजी शंभरहून अधिक पर्यटक सहलीत सहभागी होणार आहेत.

पहिल्यांदाच अशा सहलीत सहभागी पहिल्यांदाच अशा सहलीत सहभागी झाले. पर्यटन विभागाकडूनही माहिती घेण्यात आली. तसेच विविध ठिकाणची माहिती जाणून घेता आली. यामध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सूक होते. त्यामुळे नावनोंदणी केली. शेख जव्हेरिया, पर्यटक

विभागाचा चांगला उपक्रम पर्यटन सहलीच्या निमित्ताने वेरूळ, औरंगाबाद लेणी बघायला मिळाली. तेथील इतिहासाची माहिती जाणून घेण्यास मदत मिळाली. खूप छान अनुभव होता. असे उपक्रम सातत्याने राबवल्यास शहरवासीयांना फायदा होईल. रामदास मगर, पर्यटक

बातम्या आणखी आहेत...