आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम दिव्य मराठी:राजकारण सोडा, एकत्र या; माजी महापौरांचा पालिकेला सल्ला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन. यानिमित्त महापौरपद भूषवलेल्या आणि आज सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या सर्वपक्षीय माजी महापौरांनी त्यांच्या नजरेतून शहर विकासाच्या कारभारावर टाकलेला दृष्टिक्षेप...

महापौर असताना जमले नाही ते मंत्री म्हणून करू दिल्लीतून औरंगाबाद मनपाकडे बघितले तर भविष्यात औरंगाबाद मोठी झेप घेत असल्याचे चित्र आहे. शहरात राहणाऱ्या कमकुवत घटकांसाठी चाळीस हजार घरकुले मंजूर करू शकलो. शहराला सातही दिवस २४ तास पिण्याचे पाणी कसे देता येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे. डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री (कार्यकाळ : २९ एप्रिल २००० ते ३१ जुलै २००१ : भाजप)

नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण मांडणी करणे गरजेचे तेव्हा अनेक नगरसेवक शहराच्या विकासासाठी सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडायचे. त्यात राजकारण नव्हते. मात्र मागील काही वर्षांत कारभार बदलला आहेे. जुन्या शहरात पार्किंगसारखी समस्या तापदायक ठरते आहे. अनेकदा सूचना देऊनसुद्धा मनपात कामे होत नाहीत, याची खंत वाटते. प्रदीप जैस्वाल, विद्यमान आमदार (कार्यकाळ : १९ मे १९९० ते १३ मे १९९१- शिवसेना)

धोरणात्मक निर्णयात येतात अडथळे मनपाचे स्वरूप बदलले आहे. ड्रेनेज, पॅचवर्क असे अनेक छोटे छोेटे विषय सभागृहात येतात. हे विषय झोन पातळीवरच अधिकाऱ्यांनी सोडवले पाहिजे. ते होत नाही म्हणून नगरसेवकांना ते विषय सभागृहात मांडावे लागतात. त्यामुळे सभागृहात शहराच्या विकासाचे धोरणात्मक निर्णय रखडतात. नंदकुमार घोडेले, माजी महापौर (कार्यकाळ : २९ ऑक्टो. २०१७ ते फेब्रुवारी २०१९ : शिवसेना)

राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सभागृहात आल्यानंतर राजकारण विसरून सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमच्या काळात तसे व्हायचे. त्यामुळेच आम्ही एएमटी, ऑक्ट्राॅयचा मुद्दा, पाणीपुरवठा योजना असे अनेक मुद्दे मार्गी लावले. सगळे नगरसेवक एकत्र असल्यामुळे अधिकाऱ्यांवर वचक राहायचा. किशनचंद तनवाणी, महानगरप्रमुख (कार्यकाळ : २९ एप्रिल २००५ ते १४ नोव्हें. २००६-शिवसेना )

प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य पाहिजे आमच्या काळात युती सरकार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला. शहरातील मोठी कामे मार्गी लागली. शहर वाढले, मात्र नवीन वसाहतींचे प्रश्न तसेच राहिले. मूलभूत प्रश्नही सोडवले गेले नाहीत. नगरसेवकांची एकजूट हवी तरच काम करून घेता येऊ शकते. शीलाताई गुंजाळ, माजी महापौर (कार्यकाळ : २० एप्रिल १९९८ ते २० एपिल १९९९ शिवसेना)

नगरसेवक-प्रशासनात संवाद, समन्वय नाही प्रशासनाचे नगरसेवकांना सहकार्य मिळत नाही आणि मुलभूत प्रश्नसुद्धा मार्गी लागत नाहीत. नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवत केवळ विकास हा एकमेव मुद्दा लावून धरला तर अधिकाऱ्यांना काम करावेच लागते. आमच्या वेळी हीच एकजूट आमचे बलस्थान होते. आज ती परिस्थिती नाही. सुनंदा कोल्हे, माजी महापौर (कार्यकाळ : २९ एप्रिल १९९५ ते १८ एप्रिल १९९६-शिवसेना)

महापालिकेसमोरील आव्हाने बदलली महापालिकेसमोरील आजची आव्हाने बदलली आहेत. पालिकेला केंद्राकडून निधी मिळत आहे. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. जी -20 परिषदेसाठी निधी मिळणार आहे. नागरिकांना अत्याधुनिक सुविधाही मिळणार आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. विजया रहाटकर, केंद्रीय सचिव, भाजप (कार्यकाळ : २९ नोव्हेंबर २००७ ते २८ एप्रिल २०१०-भाजप)

बातम्या आणखी आहेत...