आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय बालगट सॉफ्टबॉल स्पर्धा:महाराष्ट्र संघ रवाना; श्रृष्टी बागुल अमरावतीचा राज आढाव करणार संघाचे नेतृत्व

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेशच्या करनूल सिटीमध्ये 24 ते 29 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय बालगट साॅफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 32 सदस्यीय मुलामुलींचा संघ बुधवारी (23 नोव्हेंबर) रवाना झाला आहे. स्पर्धेत मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी अमरावतीच्या राज आढावची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींच्या संघाचे नेतृत्व जळगावची श्रृष्टी बागूल करणार आहे. त्याचबरोबर संघात महेश सुराशे, खुशबू शेख, गरिमा थोरात या औरंगाबादच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या संघाला राज्य संघटनेतर्फे व जिल्हा क्रीड अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते गणवेशाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाला क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, राज्य संघटनेचे सचिव डॉ. प्रदिप तळवेळकर, गोकुळ तांदळे, डॉ. सुरज येवतीकर, नितीन पाटील, डॉ. दत्ता पाथ्रीकर, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. उदय डोंगरे, एकनाथ साळुंके, प्रा. राकेश खैरनार, सागर रुपवते, सचिन बोर्डे आदींनी शुभेच्छा दिल्या.

कोल्हे, बेटूदे संघाचे प्रशिक्षक

स्पर्धेसाठी मुलांच्या संघ प्रशिक्षकपदी कल्पेश कोल्हे व मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी गणेश बेटूदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून राज भिलारे, संतोष आवचार, माधुरी आढाव, सायमा बागवान यांच्यावर जाबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकुलावर झालेल्या 28 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे

मुले - महेश सुराशे (औरंगाबाद), प्रणव जाधव, श्रीराज पाटील (कोल्हापूर), राज आढाव, मनन येवतिकार (अमरावती), समर्थ पाटील (सोलापूर), ओम पाटील (अहमदनगर), संभाजी देशमुख (परभणी), रत्नशील डोंगरे, सम्यक गजभिये (यवतमाळ), प्रणव डुके (सांगली), अनोश कांबळे (पिंपरी चिंचवड), वेद पाटील, यदन्येश त्रिपाठी (जळगाव), श्रेयश राठोड (अकोला), गणेश कडाळे (नाशिक).

मुली - खुशबू शेख, गरिमा थोरात (औरंगाबाद), समानता फर्नांडिस (मुंबई), प्रियांका बिंद, रूपाकुमारी महतो (नागपूर), कोमल चौधरी, श्रृष्टी बागुल (जळगाव), दक्षिता कामिरे, मनाली कांबळे (कोल्हापूर), समृद्धी आढाव (अकोला), प्रियांका सिरसाठ, नेहा दाभाडे (पिंपरी चिंचवड), मैथिली राडे, अनुष्का सावंत, श्रेया पवार (सांगली), वैष्णवी धोंडे (अहमदनगर).

बातम्या आणखी आहेत...